Ad will apear here
Next
आज अभीनेत्री स्मिता तांबे चा वाढदिवस

जन्म.११ मे १९८३ सातारा येथे.
स्मिता तांबे म्हणजे अष्टपैलू अभिनेत्री. मालिका असो वा चित्रपट स्मिता तांबेने नेहमीच आपल्या अभिनयाने त्या भूमिकेवर छाप उमटवली आहे. आपल्या सशक्त स्त्री व्यक्तिरेखांमुळे अभिनेत्री स्मिता तांबे सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. 

स्मिता तांबेचा जन्म महाराष्ट्रात साताऱ्या मध्ये झाला असला तरी ती पुण्यात लहानाची मोठी झाली. पुढे मराठी चित्रपट सृष्टीत करिअर करण्यासाठी म्हणून मुंबईत आली. स्मिता तांबेने स्वत:ला फक्त मराठीपुरता मर्यादीत ठेवले नाही तिने हिंदीमध्ये सुद्धा आपल्या कामाचा ठसा उमटवला. सिंघम रिर्टन्स, रुख, नूर, डबल गेम या हिंदी चित्रपटांमध्येही तिने काम केले. 

सॅक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीझनमध्ये त्याशिवाय माय नेम इज शीला या दोन वेबसीरिजमध्येही तिने काम केले आहे.

२००९ साली आलेल्या जोगावा या चित्रपटातील तिची भूमिका विशेष गाजली. त्यानंतर २०१३ साली अक्षय कुमारची निर्मिती असलेल्या ७२ मैल एक प्रवास या चित्रपटात तिने रंगवलेली राधाक्का आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मराठी मालिका असो वा चित्रपट, मैत्रिण, नायिका, आई कुठलाही रोल असो, स्मिता तांब आपल्या भूमिकेची प्रेक्षकांना दखल घ्यायला भाग पाडतेच.

नुकतीच ती 'लाडाची मी लेक गं' या मालिकेत स्मिता तांबे डॅशिंग मम्मीच्या भूमिकेत दिसली होती. काळजी घेणारी सौरभची आई ते आपल्या नजरेच्या आणि शब्दाच्या धाकाने गुन्हेगारी विश्व संभाळणारी महिला असा रोल तिने केला आहे.

स्मिता तांबे निर्माती सुद्धा आहे. रिंगिंग रेन हे तिचे प्रोडक्शन हाऊस आहे. मागच्याच वर्षी तिने आपल्या प्रोडक्शन हाऊसतंर्गत सावट या चित्रपटाती निर्मिती केली. यात तिने एसीपी आदिती देशपांडेची भूमिका साकारली होती. जानेवारी २०२० मध्ये स्मिताने अभिनेता विरेंद्र द्विवेदी सोबत लग्न केले आहे. सध्या ती मराठी लोकसाहित्यामध्येही ती पीएचडी करत आहे.

संजीव_वेलणकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ETKLCY
Similar Posts
बाबूराव रामजी बागुल यांचा जन्मदिन आज दलित लेखकांमधले प्रमुख साहित्यिक बाबूराव रामजी बागुल यांचा जन्मदिन. जन्म. १७ जुलै १९३० नाशिक येथे. बाबूराव बागुल मूळचे नाशिकचे. ‘वेदाआधी तू होतास...वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास...तुझ्यामुळेच सजीवसुंदर झाली ही मही...’ यासारखी मानवाचा नव्याने वेध घेणारी विद्रोही कविता लिहिणारे बाबूराव बागुल हे दलित लेखकांमधले प्रमुख साहित्यिक
रणजितसिंग यांचा स्मृतिदिन आज एका शूर, मुत्सद्दी, युद्धशास्त्रज्ञ, पराक्रमी, शिकारी रणजितसिंग यांचा स्मृतिदिन. जन्म. १३ नोव्हेंबर १७८० पाकिस्तानमध्ये गेलेल्या गुजरानवाला प्रांतात. रणजितसिंग यांचा जन्म संधावालिया घराण्यात महाराजा सुकरचाकीया आणि राणी राज कौर यांच्या पोटी झाला. रणजितसिंग' यांचा एकंदर जीवनकाल ५९ वर्षांचा. वडिल
संगीतकार इक्बाल कुरेशी यांचा जन्मदिन जन्म. १२ मे १९३० औरंगाबाद येथे आज इक्बाल कुरेशी म्हटले, की सर्वप्रथम आठवतो तो १९६४चा चित्रपट ‘चा चा चा!’ अभिनेता चंद्रशेखर या चित्रपटाचा नायक आणि दिग्दर्शक होता.
आज संत नामदेव यांची पुण्यतिथी जन्म. २६ ऑक्टोबर १२७० संत नामदेव यांचा जन्म शिवाजी महाराजांच्याही जवळपास चारशे वर्षं आधी. तेव्हा उत्तरेत मुस्लिम सत्ता स्थिर झाली होती. दक्षिणेत त्याचा पायरव ऐकू येत होता. धर्माच्या नावाने हिंदू धर्म मार्तंड आणि मुस्लिम शासक बहुसंख्य भारतीयांना दुय्यम दर्जाचं जिणं जगण्यास भाग पाडत होते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language